ई-लर्निंग व्यवस्थापन यंत्रणा
एनसीएफई ने बँकिंग, सिक्युरिटीज मार्केट्स, विमा आणि पेन्शन उत्पादने या विषयांचा समावेश असलेल्या मूलभूत आर्थिक शिक्षणावर ई-लर्निंग कोर्स सुरू केला आहे. पैसे आणि व्यवहार, आर्थिक नोंदी आणि करार, उत्पन्न आणि खर्चाचे व्यवस्थापन, दीर्घकालीन नियोजन, आर्थिक सुरक्षा आणि विमा, घोटाळे आणि फसवणूक इ. अशाप्रकारे विषय पुढे 20 मॉड्यूल्समध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक मॉड्यूल सुमारे 15-20 मिनिटांचा असल्यासह हा कोर्स 5 तासांचा आहे.
ई-लर्निंग कोर्स सर्व नोंदणीकृत वापरकर्त्यांना विनामूल्य दिला जातो. हा कोर्स वापरकर्त्यांना वित्तीय साक्षरतेचा प्रसार करण्यावर भक्कम ज्ञानाचा आधार देईल, ज्यामुळे मागणी-बाजूचे अडथळे दूर होण्यास मदत होते कारण यामुळे ग्राहकांना माहिती मिळते आणि चांगले आर्थिक निर्णय घेणे आणि शेवटी आर्थिक कल्याण सक्षम होते. प्राथमिकत: कोर कम्पेटेन्सीज ऑन फायनाशियल लिटरसी डॉक्युमेंट ऑफ ओइसीडी-आयएनएफइ (इंटरनॅशनल नेटवर्क ऑन फायनान्शियल एज्युकेशन) वर आधारित पुस्तक कपॅसिटी बिल्डींग फॉर फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम्स (सीएबीएफएलपी) मधून कोर्सचे घटक घेतले गेले आहेत
नमुना मॉड्यूल्स


येथे स्कॅन करा
कोर्ससाठी नोंदणी करा
*संपूर्ण 20 मॉड्यूल्समध्ये ॲक्सेस करण्यासाठी, कृपया आमच्या e-LMS पोर्टलवर आपली नोंदणी करा.
कोणतेही नोंदणीकृत वापरकर्ते कोर्समध्ये प्रवेश करू शकतात आणि नोंदणी विनामूल्य आहे. नोंदणी पूर्ण करण्यासाठी वापरकर्त्याने प्रमाणीकृत ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर प्रदान करणे आवश्यक आहे.
वापरकर्ता https://ncfearthashiksha.in येथे नोंदणी करू शकतो आणि स्मार्टफोन/PC द्वारे अभ्यासक्रमात प्रवेश करू शकतो. iOS/अँड्रॉइड स्टोअर वरून अधिकृत मूडल ॲप डाउनलोड करून मोबाईल ॲप्लिकेशन वापरून देखील कोर्स ॲक्सेस केला जाऊ शकतो.
प्रतिक्रिया किंवा NCFE E-LMS शी संबंधित कोणत्याही प्रश्नांसाठी कृपया आम्हाला “elms@ncfe.org.in” वर लिहा